mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

छत्रपती शिवराय-महाराणी गुणवंताबाईंच्या विवाह स्मृतींना ३७० वर्षे पूर्ण : 370 Years of Wedding Memories: Chhatrapati Shivrai and Maharani Gunvantabai

शेअर करा :

370 Years of Wedding Memories: Chhatrapati Shivrai and Maharani Gunvantabai : छत्रपती शिवराय-महाराणी गुणवंताबाईंच्या विवाह स्मृतींना ३७० वर्षे पूर्ण

370 Years of Wedding Memories: Chhatrapati Shivrai and Maharani Gunvantabai
१५ एप्रिलला करवंड येथे ऐतिहासिक महोत्सव

बुलढाणा

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि चिखली तालुक्यातील करवंड येथील महाराणी गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाहाच्या स्मृतींना ३७० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि करवंड महोत्सव कृती समिती यांच्या वतीने बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन नागरिकांना घडणार आहे. आमदार श्वेता महाले व करवंड महोत्सव कृती समितीने या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

महोत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अभिषेकाने होईल. त्यानंतर सकाळी ८ ते १० या वेळेत भव्य ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत लेझीम पथक, बँड, अश्वदल, पालखी आणि ऐतिहासिक वेशभूषेतील मावळ्यांचा सहभाग राहील. लाठी, तलवारबाजी, दांडपट्टा आणि आगीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण यावेळी केले जाईल.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

 

दुपारच्या सत्रात शाहिरी आणि व्याख्यानांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिवशाहीर प्रवीणजी फणसे (मुंबई) यांचा दुपारी १२ ते १.३० या वेळेत पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. प्रा. यशवंत गोसावी हे दुपारी १.३० वाजता ऐतिहासिक व्याख्यान देतील. शाहीर विक्रांत राजपूत (बुलढाणा) हे दुपारी ३.३० वाजता लोककला सादरीकरण करतील.

रामचंद्र पाटील (पुणे) सायंकाळी ४.३० वाजता युगपुरुष शिवराय या विषयावर विचार मांडतील. डॉ. नम्रता भोसले-मोहिते सायंकाळी ५.३० वाजता ‘मराठकालीन स्त्री सामर्थ्य या विषयावर व्याख्यान देतील.

 

शिवरायांच्या शौर्याचे प्रसंग करणार सादर

महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रात्री ७ ते १० या वेळेत होणारा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. उदय साटम (मुंबई) यांच्या दिग्दर्शनाखाली ४५ कलाकार भव्य स्टेजवर शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंग, युद्धे, गोंधळ, जोगवा आणि कोळीगीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा अविष्कार सादर करतील. कार्यक्रमाचा समोराप रात्री १० वाजता बावण बुरुजावरून होणाऱ्या नयनरम्य बारूद आतषबाजीने होईल.

 

शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे प्राचीन शस्त्रे व नाणी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आणि महिला बचत गटांचे स्टॉल्स हे असणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवरायांच्या सर्व महाराणींच्या घराण्यातील वंशज विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह महोत्सव समितीने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top