mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गंभीर रुग्णांसाठी जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवा : Palliative care services in the district for critically ill patients

शेअर करा :

Palliative care services in the district for critically ill patients : गंभीर रुग्णांसाठी जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवा.

Palliative care services in the district for critically ill patients

बुलढाणा : गंभीर व दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. असाध्य व जीवघेण्या आजारांमुळे त्रस्त रुग्णांना औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार व सामाजिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे.

पॅलिअटिव्ह केअर अंतर्गत कर्करोग, किडनी किंवा यकृत निकामी, अर्धांगवायू, दीर्घकालीन श्वसन विकार तसेच इतर असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदना नियंत्रण, लक्षणांवर उपचार, मानसिक मार्गदर्शन आणि कुटुंबीयांना समुपदेशन करण्यात येणार आहे. ही सेवा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालया तसेच ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रुग्णांच्या घरी भेट देऊनही सेवा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

गंभीर रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या वेदना कमी करण्याकरिता पॅलिअटिव्ह केअर सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. या सेवेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनीही या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करीत सांगितले की, जिल्हा रुग्णालय व सर्व अधिनस्त आरोग्य संस्थांमार्फत गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top