mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

प्रशासक नाही, सरपंचच राजा : No administrator, the Sarpanch is the king

शेअर करा :

No administrator, the Sarpanch is the king : प्रशासक नाही, सरपंचच राजा.

No administrator, the Sarpanch is the king

राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार २३७  ग्रामपंचायती वर प्रशासक म्हणून सरपंच विराजमान होणार.

डोणगाव : राज्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२६  मध्ये १४  हजार च्या जवळपास ग्रामपंचायतीचा कार्यकाळ समाप्त होणार आहे मात्र काही कारणाने ह्या निवडणुकी लांबणीवर जाणार ज्याला पाहता या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची निवड करण्याची शासनाने योजना आखली होती याविरुद्ध मेहकर तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरविंद दळवी व इतर सहा महिला सरपंच यांनी नागपूर खंडपीठांमध्ये याचिका दाखल करून दाद मागितली होती ज्याला पाहता राज्यातील १४०००  ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंच हेच कारभार सांभाळणार.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये २०२६  मध्ये २५५  ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपणार असून या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येणार होता यासाठी शासनाने पूर्ण तयारी सुद्धा केली होती मात्र मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष अरविंद दळवी व इतर सहा महिला सरपंच यांनी प्रशासक नेमणुकीसाठी विस्तार अधिकारी ऐवजी गावाच्या समस्यांची जाण असलेला सरपंच यालाच प्रशासन म्हणून नेमण्यात यावे जेणेकरून गावाच्या विकासाचा गाडा थांबणार नाही यावर नागपूर खंडपीठाने सरते शेवटी निकाल देऊन सरपंच हाच गावाचा गाव गाडा चालवणार व तोच पुढील सहा महिने प्रशासक म्हणून कारभार चालवणार याला पाहता विकासासाठी तळमळ असणारे सरपंच यांना गावाचा विकासाची संधी मिळाली तर नेहमीच भ्रष्टाचाराचा आरोप होणारे सरपंच पुन्हा गावाचा कारभार सांभाळणार याला पाहता पुन्हा कारभारामध्ये भ्रष्टाचार होणार त्यामुळे कित्येक गावात ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांच्यामध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

No administrator, the Sarpanch is the king

प्रशासक पदी सरपंच हा सहा महिने किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन कार्यकाळ चालू होईपर्यंत राहणार असून यासोबतच गावाचा कारभार सुरळीत चालावा यासाठी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची समिती स्थापन होणार.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top