mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाणा जिल्ह्यात ७ मार्चपासून ‘महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ : ‘Maharajaswa Samadhan Shibir’ campaign launched in Buldhana district from March 7

शेअर करा :

‘Maharajaswa Samadhan Shibir’ campaign launched in Buldhana district from March 7 :  बुलढाणा जिल्ह्यात ७ मार्चपासून ‘महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ.

बुलढाणा : जिल्ह्यातील जनतेसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, महसूल विभागाच्या सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार, ७ मार्च २०२६ पासून मंडळ स्तरावर या विशेष मोहिमेची सुरुवात होणार आहे.

​’सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’वर भर: ​या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ अर्ज स्वीकारणे नसून, एकाच दिवसात सेवा प्रदान करणे हा आहे. याद्वारे महसूल प्रशासनाला अधिक कार्यक्षम करणे आणि शेतकऱ्यांचे प्रलंबित फेरफार तसेच ७/१२ मधील त्रुटी तातडीने दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​मिळणाऱ्या प्रमुख सेवा: ​या शिबिरामध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध असतील. यामध्ये फेरफार अदालती, डिजिटल ७/१२ व ८अ वाटप, उत्पन्न, जात व रहिवासी दाखल्यांचे वितरण, आणि तक्रार निवारण, PM किसान नोंदणी, ई-KYC, ‘युनिक फार्मर आयडी’ तयार करणे आणि घरकुल योजनेसाठी अर्ज मंजुरी, संजय गांधी निराधार योजना अर्ज, ABHA कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड वितरण आणि नवीन रेशन कार्ड अर्ज अशा सुविधा उपलब्ध होणार आहे.

​हे अभियान ७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत विविध टप्प्यांत राबवले जाईल. दि. ​७ मार्च रोजी बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार यांसह विविध तालुक्यांतील मंडळ स्तरावर तर ​पुढील टप्पे१४ मार्च, १० एप्रिल, १७ एप्रिल, ४ मे आणि १५ मे रोजी जिल्ह्याच्या विविध भागांत हे शिबिर पार पडेल. तसेच ​चिखली तालुक्यातील अमडापूर येथे ८ मार्च २०२६ रोजी विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे. येथे महसूल कामांसोबतच ‘राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण’ (NALSA) मार्फत कायदेशीर मार्गदर्शन आणि विधी सेवांचा लाभही नागरिकांना घेता येईल.

​जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top