mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सैलानीत आज लाखो नारळांची होळी :  Holi of millions of coconuts in Sailani today

शेअर करा :

Holi of millions of coconuts in Sailani today : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रोत्सवातील खास आकर्षण असलेला होळीचा जगावेगळा उत्सव आज २ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. लाखो नारळांची होळी पेटवून यात्रा महोत्सव सुरू होणार आहे.

Holi of millions of coconuts in Sailani today



सैलानी बाबांच्या यात्रोत्सवाला उसळणार गर्दी
बुलढाणा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रोत्सवातील खास आकर्षण असलेला होळीचा जगावेगळा उत्सव आज २ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. लाखो नारळांची होळी पेटवून यात्रा महोत्सव सुरू होणार आहे.

बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी भाविक जमण्यास सुरुवात झाली आहे. होळीच्या पाच दिवसांपूर्वीपासूनच सैलानी बाबांची यात्रा भरण्याला सुरुवात होते. यात्रेचे विशेष आकर्षण असलेला  सैलानी बाबांचा संदल ८ मार्च रोजी निघणार आहे. यात्रा पंधरा दिवस चालते. यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. तसेच मनोरंजनाची नानाप्रकारची साधनेदेखील लावण्यात आली आहेत. होळीच्या सणापासून यात्रेला प्रारंभ होत असल्याने प्रशासनाने गेल्या पंधरवड्यापासूनच सुयोग्य नियोजन केले आहे.

लाखो नारळांच्या होळीसाठीही प्रशासनाने तयारी केली आहे.  होळीभोवती प्रदक्षिणा मारल्यानंतर मनोरुग्णांच्या व्याधी दूर होतात, अशी धारणा असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक होळीच्या दर्शनासाठी जमतात.यावेळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काळे बाहुले, सुया, लिंबू, खिळे टाचलेले नारळ मनोरुग्णाच्या अंगाखांद्यावर ओवाळून होळीत फेकण्याची परंपरा येथे जोपासली जात आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत आहेत. होळीत अनेक भाविकांकडून जिवंत कोंबड्यांचाही बळी दिला जातो. हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top