Transport of 26 cattle in a convoy : दोन आयशरमध्ये कोंबून चालविलेल्या २६ गोवंशांची गो-प्रेमींच्या सतर्कतेमुळे सुटका झाली. ३ मार्च रोजी शहरातील धाड नाक्यावर ही वाहने अडविण्यात आली.

बुलढाणा : दोन आयशरमध्ये कोंबून चालविलेल्या २६ गोवंशांची गो-प्रेमींच्या सतर्कतेमुळे शहर पोलिसांनी सुटका केली. ३ मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास शहरातील धाड नाक्यावर ही वाहने अडविण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मराठवाड्यातील सिपोरा बाजारच्या दोघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहे.
आरोपी शेख शफीक शेख रफिक व शेख आसिफ बशीर शेख (सिपोरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना) या आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० कलम ११ (१) (सी) (डी) (जी) (जे), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ तसेच बीएनएस कलम ३ (५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. धुलीवंदनानिमित्त धाड नाक्यावर पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर होते. काही गो-प्रेमींनी धाडकडून येणारे एमएच-०४-एफयू-१६१९ व एमएच-२०-ईजी-४३७२ या क्रमांकाचे दोन आयशर अडविले. या वाहनांमधून प्रत्येकी १३ बैल अशा २६ गोवंशांची श्वास गुदमरेल या स्थितीत कोंबून वाहतूक केली जात होती. तसेच चारा, पाण्याची सोयदेखील नव्हती. वेदनादायक स्थितीत बैल बांधलेले आढळून आले.
या गोवंशांना कत्तलीसाठी नेण्यात येत होती, अशी चर्चा घटनास्थळी सुरू असल्याने पीएसआय रवी मोरे, पोहेकॉ संदीप कायंदे व अन्य कर्मचारी दाखल झाले. या प्रकरणी पोलीस शिपाई नीलेश देशमुख यांनी तक्रार दिल्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
बुलडाणा अर्बनच्या गो-शाळेत रवानगी
या गोवंशांना सुटका करून येळगाव येथील बुलडाणा अर्बनच्या गो शाळेत पाठविण्यात आले.


