mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

Buldhana Crime : रूप बदलून देशभर फिरणाऱ्या आरोपीस अटक; अपहरण करून केली होती हत्या

शेअर करा :

Buldhana Crime :  एकाचे अपहरण करून हत्या केल्यानंतर फरार झालेला मुख्य सूत्रधार वेशांतर करून देशभर फिरत राहिला. तब्बल दीड वर्षांनंतर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला.

Buldhana Crime

बुलढाणा : एकाचे अपहरण करून हत्या केल्यानंतर फरार झालेला मुख्य सूत्रधार वेशांतर करून देशभर फिरत राहिला. तब्बल दीड वर्षांनंतर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. छत्रपती संभाजीनगर येथून त्यास शिताफीने अटक करण्यात आली.
मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील दिलीप इंगळे (वय ४५) यांचे २२ जून २०२४ रोजी आरोपी अमोल जयसिंग राजपूत (वय ३८) याच्यासह साथीदारांनी अपहरण केले. अहमदनगर भागात हत्या केली होती. या प्रकरणातील त्याच्या पाच साथीदारांना अटक करण्यात आली. मात्र, अमोल राजपूत हा वेश बदलून पोलिसांना गुंगारा देत राहिला. स्वत:ची ओळख लपवून आरोपी राजपूत हा छत्तीसगड, चंदीगढ, कर्नाटक, दिल्ली अशा विविध प्रांतात वेशांतर करून राहात होता. हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना आदेश दिले. त्यानुसार पथकांनी कसून तपास सुरू केला. अखेर ६ जानेवारीला आरोपीला अटक करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top