Union Minister of State Prataprao Jadhav welcomed the victorious Indian team at the Asian Lacrosse Championship.: ऐशियन लेक्रॉस स्पर्धेत विजेत्या भारतीय संघाचे केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले स्वागत

बुलढाणा, दि. 17 : ऐशियन लेक्रॉस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवुन देणाऱ्या भारतीय संघाचे केंद्रिय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वागत केले असुन भारतीय संघात सहभागी झालेल्या सागर बोर्डे यांचा प्रातिनीधीक स्वरुपात सत्कार केला.
साऊदी अरब येथील रियाद येथे 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान ऐशियन लेक्रॉस स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारतीय संघामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सागर बोर्डे सहभागी झाला होता. त्यांच्या संघाने इराक विरुध्द झालेल्या शेवटच्या सामन्यामध्ये 9-2 फरकाने विजय मिळवत भारताला ऐशियन लेक्रॉस स्पर्धेत अजिंक्य पद मिळाले. या संघामध्ये देशभरातुन 18 खेळाडु सहभागी झाले होते. विजेत्या चमुचे केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वागत केले असुन प्रातीनिधीक स्वरुपात मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात संघातील खेळाडु सागर बोर्डे यांची नुकत्याच सत्कार केला.


