mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

एसटी सेवानिवृत्तांना वर्षभर मोफत प्रवासाचा ऐतिहासिक निर्णय : Historic Decision: Free Travel for ST Retirees for One Year

शेअर करा :

Historic Decision: Free Travel for ST Retirees for One Year : एसटी सेवानिवृत्तांना वर्षभर ‘मोफत प्रवास’चा ऐतिहासिक निर्णय

Historic Decision: Free Travel for ST Retirees for One Year

बुलडाणा (प्रतिनिधी):

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रतापरावजी सरनाईक यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत, पती-पत्नीला वर्षभर सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास पास देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाबद्दल एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा रिपाइं (आठवले) जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी मंत्री महोदयांचे जाहीर अभिनंदन केले आहे.

Historic Decision: Free Travel for ST Retirees for One Year

 

​सेवेचा सन्मान राखला:

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. ३०-४० वर्षे ‘प्रवासी हेच आमचे दैवत’ मानून सेवा केल्यानंतरही, सेवानिवृत्तीनंतर त्यांना केवळ साध्या बसेसमध्येच प्रवासाची सवलत होती. वातानुकूलित, शिवशाही किंवा आशियाड सारख्या बसेसमध्ये त्यांना बसू दिले जात नव्हते, जो त्यांच्या ज्येष्ठतेचा अवमान मानला जात होता. “जो तळे राखेल तो पाणी पेईल” या उक्तीप्रमाणे, ज्यांनी महामंडळाचे तळे राखले त्यांनाच हक्काचे पाणी मिळत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांमध्ये होती.

​ऐतिहासिक बैठक आणि निर्णय:

विधानभवन येथे प्रशासन, पदाधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला. आता ‘जेष्ठ नागरिक, जेष्ठ भारत’ या संकल्पनेनुसार एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह सर्व प्रकारच्या गाड्यांतून मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाबासाहेब जाधव यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक आणि शासन प्रशासनाचे आभार मानले आहेत. “उमेदीच्या वयात तुटपुंज्या पगारावर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खऱ्या अर्थाने हा सन्मान आहे,” अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top