mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चिमुकल्या विनितच्या यशाने पालकांचे डोळे पाणावले : Little Vinit’s success brought tears to his parents’ eyes.

शेअर करा :

Little Vinit’s success brought tears to his parents’ eyes. : चिमुकल्या विनितच्या यशाने पालकांचे डोळे पाणावले

Little Vinit's success brought tears to his parents' eyes.

 बुलढाणा (प्रतिनिधी):-

आजच्या स्पर्धेच्या युगात दर्जेदार शिक्षणासाठी पालक अतोनात मेहनत घेत असतानाच, मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका कुशाग्र विद्यार्थ्याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. चि. विनित सागर गव्हाड याने शैक्षणिक सत्र २०२५-२६ च्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करून नवोदय विद्यालयातील प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे.

​शाळा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन

विनितने आपले प्राथमिक शिक्षण (इयत्ता १ ली ते ४ थी) जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, जानेफळ येथे पूर्ण केले. सध्या तो जिल्हा परिषद शाळा, कान्हेरी गवळी येथे इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत आहे. हिवरा आश्रम येथील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि स्वतःची अफाट मेहनत, जिद्द व चिकाटीच्या बळावर त्याने या कठीण परीक्षेत यश मिळवले.

​भावूक झाले कुटुंबीय

मुलाच्या या यशानंतर गव्हाड कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपल्या मुलाने आजोबा, आजी आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचे पाहून वडील आणि काकांचे डोळे आनंदाश्रूंनी ओलावले. नातेवाईक आणि मित्रमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

​शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा जानेफळ आणि कान्हेरी गवळी या शाळांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जानेफळ शाळेचे मुख्याध्यापक चांदणे सर, निकस सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विनित आणि त्याच्या पालकांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​नवोदय विद्यालयात निवड झाल्यामुळे आता विनितला इयत्ता ६ वी पासून पुढील उच्च दर्जाचे शिक्षण संपूर्ण व्यवस्थेसह मोफत मिळणार आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top