mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

विजांच्या तांडवातच शेतकरी हृदयविकाराने दगावला : Farmer dies of heart attack after being struck by lightning

शेअर करा :

Farmer dies of heart attack after being struck by lightning : वादळी वाऱ्यासह पावसापासून रब्बी पिकांच्या सुड्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. प्रचंड विजा चमकत असतानाच एक शेतकरी सूडी झाकण्यासाठी गेला. मात्र, दुर्दैवाने त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर गावात तीन ठिकाणी वीज कोसळल्याने शेकडो घरांमधील विजेची उपकरणे जळाली.

Farmer dies of heart attack after being struck by lightning

Farmer dies of heart attack after being struck by lightning

Farmer dies of heart attack after being struck by lightning

डोणगावात तीन ठिकाणी कोसळली वीज : शेकडो घरातील विद्युत उपकरणे जळाली

आसिफ शाह

मेहकर : तालुक्यातील डोणगाव परिसराला १९ मार्चच्या सकाळी अवकाळी तडाखा बसला. विजांचे प्रचंड तांडव शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी अनुभवले. वादळी वाऱ्यासह पावसापासून रब्बी पिकांच्या सुड्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. प्रचंड विजा चमकत असतानाच एक शेतकरी सूडी झाकण्यासाठी गेला. मात्र, दुर्दैवाने त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर गावात तीन ठिकाणी वीज कोसळल्याने शेकडो घरांमधील विजेची उपकरणे जळाली.

वादळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, बीजवाईच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा अनेक शेतकऱ्यांनी शेतात उघड्यावरच ठेवलेला होता. वादळी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची सूड्या झाकून ठेवण्यासाठी एकच घाई झाली. डोणगाव येथील एकनाथ शिवराम आखाडे (वय ५५) हे आपल्या मुलासोबत शेतात हरभऱ्याची सुडी झाकण्यासाठी गेले होते. यावेळी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. त्याचवेळी एकनाथ आखाडे कोसळले. त्यांना प्रचंड घाम फुटला. मुलाने त्यांना तातडीने खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. परंतु डॉक्टरने तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

 

मंदिराच्या कळसाला तडे

डोणगावातील खंडोबा मंदिरावर वीज कोसळली. यामुळे कळसाला तडे गेले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मंदिराच्या कळसाचा काही भाग खचला. त्याच परिसरातील गौरव तिफने यांच्या घरावर वीज कोसळली. पॅरापीट खचले. तसेच घरातील सर्व विद्युत उपकरणे जळाली. तसेच डोणगावावातील शेकडो लोकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून नुकसान झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top