mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गुढीपाडव्याला मुलीचा विनयभंग; सणाच्या दिवशीच चाळीसवर्षीय नराधमाचे कृत्य : Girl molested on Gudi Padwa

शेअर करा :

Girl molested on Gudi Padwa : गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना मोताळा तालुक्यातील एका गावात चाळीसवर्षीय नराधमाने गालबोट लावले. सणानिमित्त जेवण घेऊन जाण्यास सांगितल्याने घरी गेलेल्या साडेसोळावर्षीय मुलीचा मारहाण करीत विनयभंग करण्यात आला. 

Girl molested on Gudi Padwa

मोताळा तालुक्यातील घटना : पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल 

धामणगाव बढे : गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना मोताळा तालुक्यातील एका गावात चाळीसवर्षीय नराधमाने गालबोट लावले. सणानिमित्त जेवण घेऊन जाण्यास सांगितल्याने घरी गेलेल्या साडेसोळावर्षीय मुलीचा मारहाण करीत विनयभंग करण्यात आला. 

पीडित मुलगी आणि आरोपी शेजारी राहतात. गुढीपाडव्याच्या दिवशी आरोपीच्या आईने मुलीस आवाज देऊन गुढीपाडव्याचे जेवण आहे घेऊन जा म्हटले. आरोपी कैलास हा त्याच्या घरात दुसऱ्या खोलीत होता. मुलगी स्वयंपाक घरात गेली असता आरोपीने तोंड दाबून तिचा विनयभंग केला.  विरोध केला असता आरोपीने तिला केस धरून मारहाण केली. शिवगाळ करत कुणाला सांगितले तर जीवाने मारण्याचा धमक्या दिल्या. तेवढ्यात मुलीच्या आईने आवाज दिला असता पीडितेस ढकलून दिल्याने ती कोसळली. घटनेबद्दल आई व मावशी यांना  सांगितल्यानंतर जमलेल्या नातेवाईकांनी आरोपीच्या घरी जाऊन जा विचारला असता त्याने होय, मीच मारले म्हणत निघून गेला.

याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर धामणगाव बढे पोलिसांनी विनयभंग, लैंगिक छळ, मारहाण पोक्सोसह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.

दाखल कलम

बीएनएस कलम ७४, ७५ (१) ११५ (२), ३५१ (२), ३५२ सहकलम ८, १२ पोक्सो सहकलम ३ (१) (डब्ल्यू) (i), ३ (१) (w) (ii), ३ (२) (व्हीए) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा. 

आरोपीस अटक

या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा तपास सुधीर पाटील करीत आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर ठाणेदार एपीआय नागेश जायले यांनी आरोपी कैलास याला अटक केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top