mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का. : Major Blow to the NCP (Sharad Pawar Faction) in the Presence of Union Minister Prataprao Jadhav

शेअर करा :

Major Blow to the NCP (Sharad Pawar Faction) in the Presence of Union Minister Prataprao Jadhav : केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का.

Major Blow to the NCP (Sharad Pawar Faction) in the Presence of Union Minister Prataprao Jadhav

बुलढाणा (प्रतिनिधी): सिदखेडराजा तालुक्यातील खैरव ग्रामपंचायतीच्या सरपंच नलीता गरड यांनी केंद्रीयमंत्री तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच ग्रामपंचायत सदस्य शिवानंद खेडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू तळेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज मेहेकर येथील जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेच्या निशाणाखाली उभे राहिले.

Major Blow to the NCP (Sharad Pawar Faction) in the Presence of Union Minister Prataprao Jadhav

शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्त्वावर तळागाळातील सर्वसामान्यांसाठी काम केले जात असल्याने या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतः नवप्रवेशितांना शिवसेनेचा दुपट्टा ओढून स्वागत केले. यावेळी दरेगाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक बबनराव जायभाये उपस्थित होते.

या प्रवेशामुळे सिदखेडराजा तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठी खिंडार पडली असून, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे. “जनतेच्या सेवेसाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना अजून मजबूत होत आहे,” असे प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top