Three people attack relatives : जागेच्या बांधकामावरून तीन जणांनी नात्यातीलच पाच जणांना काठ्यांनी मारहाण केली. यात एका सातवर्षीय लहान मुलास काठीचा मार लागला.

बांधकामाच्या जागेवरून उफाळला जुनावाद
लोणार : जागेच्या बांधकामावरून तीन जणांनी नात्यातीलच पाच जणांना काठ्यांनी मारहाण केली. यात एका सातवर्षीय लहान मुलास काठीचा मार लागला. गांधारी येथे २१ मार्च २०२६ च्या सकाळी सात वाजता ही घटना घडली. याप्रकरणी लोणार पोलिसांनी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गांधारी येथील रहिवासी दिनकर नाथा घुले ( वय ३३) व आरोपी संजय ज्ञानबा चाटे, विजय पंजाब चाटे, व्दारका ज्ञानबा चाटे हे शेजारी राहतात. २१ मार्चला सकाळी सात वाजता जागेचा वाद उफाळून आला. दिनकर घुले व त्यांची पत्नी बांधकाम करण्यासाठी टाकलेली गिट्टी पांगल्याने जमा करत होते. यावेळी आरोपींनी ही जागा आमची आहे, बांधकाम करायचे नाही म्हणत भांडण सुरू केले. दिनकर व त्यांची पत्नी मीरा या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. एका काठीचा मार मुलगा वीर दिनकर घुले (वय ७) हा जखमी झाला. आरोपी द्वारका चाटेने दिनकर यांच्या अंगावर चटणी फेकली. त्यांची आई आणि भाऊ सोडवायला आला असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली.
दिनकर घुले यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ११८ (१), २९६, ११५ (२), ३५१ (२), ३ (५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेचा अधिक तपास पोलिस अंमलदार गजानन सानप करीत आहेत.


