mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बापानेच चोरले मुलाच्या दुकानातील इलेक्ट्रिक साहित्य : Father stole electrical equipment from sons shop

शेअर करा :

Father stole electrical equipment from sons shop : मुलाच्या इलेक्ट्रिकल दुकानासाठी आणलेले साहित्य वडिलांनी घरातून चोरून नेल्याचा प्रकार खामगाव शहरातील सजनपुरी भागात उघडकीस आला.

Father stole electrical equipment from sons shop

भंगारात विकले : खामगावातील घटनेने खळबळ

बुलढाणा : मुलाच्या इलेक्ट्रिकल दुकानासाठी आणलेले साहित्य वडिलांनी घरातून चोरून नेल्याचा प्रकार खामगाव शहरातील सजनपुरी भागात उघडकीस आला.

खामगाव शहराला लागून असलेल्या सजनपुरीचा रहिवासी मंगेश भिका भगतपुरे (वय २१) या तरुणाने इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसायाकरिता वायरचे बंडल्स, स्विचेस आणि इतर साहित्य घरात ठेवले होते. २६ फेब्रुवारीच्या सकाळी ११ ते रात्री ८ वाजेच्या सुमारास मंगेश घरात नसताना त्याचे वडील भिका लक्ष्मण भगतपुरे (वय ४५) यांनी घरातील २ मिमीचे १८० मीटर, २.५ मिमीचे ६०० मीटर आणि ४ मिमीचे १८० मीटर वायर बंडल्स, ६ एम्पियरचे ४० नग स्विचेस, २० नग सॉकेट्स, रेग्युलेटर, राऊंड प्लेट्स आणि मॉड्युलर कव्हर फ्रेम असे ४७ हजार २३० रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले.

मुलाच्या व्यवसायाचे चोरलेले साहित्य वडिलांनी ओमकारेश्वर स्मशानभूमी परिसरातील एका भंगार दुकानदाराला विकले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम ३०३ (२) आणि ३१७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संदीप टाकसाळ करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top