mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

ईदला बंधुभावाची गुंफण : A bond of brotherhood on Eid

शेअर करा :

A bond of brotherhood on Eid : रमजान ईदचा सण सर्व उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी साजरा झाला. हिंदूबांधवांनी ईदच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आलिंगन देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बंधुभावाची गुंफण दिसून आली.

A bond of brotherhood on Eid

रमजान ईदचा सण उत्साहात : अल्लाहकडे सर्वांच्या सुख, शांतीसाठी प्रार्थना

बुलढाणा : रमजान ईदचा सण सर्व उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी साजरा झाला. हिंदूबांधवांनी ईदच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आलिंगन देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बंधुभावाची गुंफण दिसून आली. ठिकठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वधर्मीयांची एकता पहायला मिळाली. 

A bond of brotherhood on Eid A bond of brotherhood on Eid A bond of brotherhood on Eid A bond of brotherhood on Eid A bond of brotherhood on Eid

पवित्र रमजान महिन्यानंतर येणारा ईद-उल-फितर सण उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. नवीन कपडे परिधान करून लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी नमाज अदा करत अल्लाहकडे शांतता, सुख-समृद्धी आणि देशाच्या प्रगतीसाठी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. रमजान महिन्यात मुस्लिमबांधव उपवास (रोजा) ठेवून आत्मशुद्धी, संयम आणि ईश्वरभक्तीचा संदेश आचरणात आणतात. दिवसभर उपवास करून गरजूंची जाणीव ठेवणे, दानधर्म (जकात व फित्रा) करणे आणि वाईट सवयींपासून दूर राहणे याला विशेष महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्याच्या साधना आणि संयमानंतर ईद-उल-फितर म्हणजे रमजान ईद हा सण साजरा केला जातो. हा सण कृतज्ञता, त्याग, बंधूभाव आणि समानतेचा संदेश देणारा असून समाजात एकता आणि प्रेम वाढवणारा आहे.

शनिवारी सर्वत्र ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आली. एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यात आल्या. घराघरांत शिरखुर्मा, सेवई अशा पारंपरिक गोड पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. अनेकांनी आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि शेजाऱ्यांना घरी आमंत्रित करून सणाचा आनंद द्विगुणित केला.

यावेळी सामाजिक सलोख्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. विविध धर्मीय नागरिकांनीही मुस्लिमबांधवांना भेटून शुभेच्छा दिल्या. रमजान ईदच्या निमित्ताने सर्वत्र आनंद आणि एकात्मतेचे चित्र पाहायला मिळाले.

राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव 

स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर व गावांमध्ये कार्यक्रमात तसेच ईदगाहवर मुस्लिमबांधवांच्या भेटी घेऊन आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top