mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

निंंबोळा देवी यात्रेतून महिला बेपत्ता : Woman goes missing from pilgrimage

शेअर करा :

Woman goes missing from pilgrimage : नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी यात्रेमधून एक विवाहित महिला बेपत्ता झाली.

Woman goes missing from pilgrimage
बेपत्ता झालेल्या शिवानी

गुढीपाडव्याच्या दिवशी ची घटना

नांदुरा : गुढीपाडव्याच्या दिवशी २५ वर्षीय महिला निंबोळा देवी यात्रेतून बेपत्ता झाली.

गुढीपाडवा (चैत्र शुक्ल प्रतिपदा) च्या मुहूर्तावर तालुक्यातील निंबोळा येथे निंबोळा देवीची यात्रा भरली. शिरसोडी येथील भूषण मारोती भोलनकर व त्यांची पत्नी शिवानी देवीच्या दर्शनाला गेले होते. यात्रेत गर्दीत पती-पत्नीची ताटातूट झाली. त्यांनी इतरत्र तसेच नातेवाइकांकडे शोध घेतला. परंतु शिवानी या सापडल्या नाही.  पतीने अखेर पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दिली.

रंग गोरा, उंची ५ फूट, बांधा सडपातळ, चेहरा लांब, अंगात हिरव्या रंगाची साडी व लाल पांढऱ्या रंगाची चप्पल घातलेली असे बेपत्ता महिलेचे वर्णन आहे. पुढील तपास पोहेकाॅ चिखलकर करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top