संगीत मानवी भावना व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम : Music is a powerful medium for expressing human emotions

मालती शेळके यांचे प्रतिपादन : स्वरविहार संगीत विद्यालयाचा सांज पाडवा उत्साहात
बुलढाणा : संगीत हे प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग असून मानवी जीवनातील भावना व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षा मालती शेळके यांनी केले.
स्थानिक शारदा ज्ञानपीठच्या खुल्या रंगमंचावर स्वरविहार संगीत विद्यालयाचा सांजपाडव्यानिमित्त हिंदी व मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम २२ मार्चला पार पडला.
यावेळी शेळके म्हणाल्या, संगीत हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग असून मानवी मनाला आनंद प्राप्त करायचा असेल तर प्रत्येकाने संगीत कलेचे धडे घेतले पाहिजे. स्वरविहार संगीत विद्यालयाचा हा सोहळा अतिशय दैदीप्यमान असून या विद्यालयातून दर्जेदार कलाकार तयार होतील व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ अरविंद टाकळकर गुरुजी, डॉ. गजेंद्र निकम, सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी लताताई गुर्जर, बुलढाणा साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांची यथोचित भाषणे झाली. यावेळी स्वरविहार संगीत विद्यालयाच्या डॉ. मिलिंद जाधव, डॉ. विवेक इंगळे, डॉ. रवींद्र गोफणे, डॉ. गजेंद्र निकम, डॉ. मंजुश्री खोब्रागडे, ॲड. अमोल देशपांडे, गजानन घिरके, लताताई गुर्जर, शिल्पा डाबेराव, इंजिनिअर ज्योती खरे, प्रा. रत्नमाला जाधव, प्रसेनजित मोरे, आर्यन सरोदे, अनया डोंगरे, प्रणिका जाधव,अभिनव हिवाळे,विमल काळवाघे,शीला नाफडे, संतोषी झाल्टे,मंजुषा जाधव,प्रतिमा सुरडकर,वैशाली मुंदे,लक्ष्मी सुरोशे,मंदा मानस्कर,नीलम श्रीवास्तव,प्रभावती करे,शैला हिवाळे,प्रिया गोफणे,अश्विनी घिरके यांच्यासह अनेक स्वरविहार च्या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. त्यांच्यासोबत अमोल दिशागज व प्रकाश खरे यांनी वाद्याची साथ संगत केली. प्रास्ताविक स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक रविकिरण मोरे यांनी केले असून सूत्रसंचालन वैशाली मोरे तर आदित्य गोफने यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला छायाचित्रकार रविकिरण टाकळकर, ॲड. धीरज मुंदे, प्रा.डॉ. हर्षानंद खोब्रागडे, नानाराव ससाणे, अशोक नाफडे, फोटोग्राफर हर्षल तायडे, क्राईम ब्रँच चे अमोल झीने यांच्यासह बुलढाण्यातील सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.


