mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

आवाज वाढव डीजेमुळे बॅंड कलाकारांवर बुरे दिन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : Bad day for band artists

शेअर करा :

Bad day for band artist : डीजेमुळे अडचणीत सापडलेल्या बँड मालक व पारंपरिक वाद्य कलाकारांनी २३ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन केले. 

Bad day for band artists
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना बँड वादक

बुलढाणा : डीजेमुळे अडचणीत सापडलेल्या बँड मालक व पारंपरिक वाद्य कलाकारांनी २३ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन केले.

जिजामाता प्रेक्षागारापासून कलाकारांनी धार्मिक व देशभक्तीपर गीते सादर करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

 

शिवसेना शिव लहुसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तांबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मातंग समाजाचे नेते विजय अंभोरे यांनी बँड कलावंतांच्या न्याय्य मागण्यांबाबत आपले मत व्यक्त केले. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आपला संघर्ष सुरू राहील, असे अंभोरे यावेळी म्हणाले. धरणे देण्यापूर्वी जिजामाता प्रेक्षागारावर सहभागी पदाधिकारी व बॅन्ड कलाकारांनी आपल्या मागण्यांना आपल्या विचारातून वाचा फोडली. डीजे संस्कृतीमुळे पारंपरिक बँड वादकांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वृद्ध बँड कलाकारांना लोककलावंत म्हणून मान्यता देऊन शासकीय मानधन द्यावे, बँड पथकांना किमान १० लाख रुपयांचे अनुदान द्यावे, हलगी, सनई, तुतारी वादकांना मानधन व सन्मान मिळावा, कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, तसेच बँड वाहनांना आरटीओ व पोलीस प्रशासनाकडून होणारी अडवणूक थांबवावी, या मागण्यांकडे आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

आंदोलनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, श्रीकृष्ण शिंदे, दादाराव महाले, बाळासाहेब बोदडे, विजय पारेकर, लक्ष्मण गवई, सोपान पानपाटील, कडू हिवाळे, तेजराव बाजोडे, दिगंबर पाटोळे, गजानन पवार, भगवान गायकवाड उपस्थित होते.

या आंदोलनात श्रीकृष्ण शिंदे, विजय पारेकर, दादाराव महाले, सुभाष निकाळजे, गजानन प्रताप गायकवाड, बाळासाहेब बोदडे, सचिन कांबळे, प्रविण कांबळे, दिनेश पारेकर, सुरेश वानखेडे, तेजराव बाजोडे, सखाराम पवार, वासुदेव साठे, नारायण खंडारे, भगवान गायकवाड, अंजना खुपराव, यमुनाबाई भालेराव, गजानन गायकवाड, भास्कर आघाम, संजय बोदडे, निंबाजी साळवे, सुनील सुरळकर, रमेश मानकर, रमेश वानखेडे, संजय घोडे, गणेश क्षीरसागर, गणेश बोदडे, कृष्णा शिरगोळे, सखाराम पवार, भास्कर जाधव, किशोर कांबळे, विष्णू खंडारे, गोविंदा वानखेडे, अर्जून तायडे, नाना बोरले, विनोद मानकर, दामोदर सुरळकर, सीताराम सुरळकर, अशोक ताकतोडे, प्रवीण अंभोरे, तुकाराम कसारे, अमोल पानपाटील, शिवाजी वाडसे यांच्यासह बँड मालक, पारंपरिक वाद्य कलावंत, डफडे, सनई, तुतारी वादक सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top