mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सावत्र आईकडून मारहाण : Physical abuse by stepmother

शेअर करा :

Physical abuse by stepmother : सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका.

 

Physical abuse by

बुलढाणा : मलकापूर येथील वरखेड गावात सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या 14 वर्षीय बालिकेची चाईल्ड हेल्प लाईन 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व मलकापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली.

दि. 22 मार्च 2026 रोजी या घटनेची माहिती चाईल्ड हेल्प लाईनला प्राप्त होताच प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बाल कल्याण समिती यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू केली. यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने वरखेड येथे भेट देऊन चौकशी केली असता संबंधित बालिकेला सावत्र आईकडून मारहाण होत असल्याचे निष्पन्न झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.

चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने बालिकेसह तिच्या मोठ्या भावाला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी चौकशी करून संबंधित सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बालिकेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असता, समितीच्या आदेशानुसार तिला संरक्षण व काळजीच्या दृष्टीने सखी वन स्टॉप सेंटर, बुलडाणा येथे दाखल करण्यात आले. यानंतर चाईल्ड हेल्प लाईनच्या समुपदेशकांनी बालिकेचे समुपदेशन केले. सदर प्रकरणाची पुढील कार्यवाही बाल कल्याण समिती, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top