mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

नागरिकांसाठी पोलीस प्रशासनाचे महत्त्वपूर्ण आवाहन : A Significant Appeal from the Police Administration to Citizens

शेअर करा :

A Significant Appeal from the Police Administration to Citizens : नागरिकांसाठी पोलीस प्रशासनाचे महत्त्वपूर्ण आवाहन. अफवांपासून सावध राहा फक्त अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या.

A Significant Appeal from the Police Administration to Citizens

धाड  : येथील पोलीस स्टेशन धाड यांच्या वतीने सर्व नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर इराण व अमेरिका युद्धासंदर्भात विविध अफवा पसरत असल्याचे निदर्शनास आले असून, नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, कोरोनाकाळातील जुने फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करून भीती निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे सांगितले आहे.

सोशल मीडियावर येणाऱ्या अप्रमाणित बातम्या त्वरित फॉरवर्ड न करता, त्या आधी सत्यता पडताळून पाहावी. नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रोतांवर—जसे की भारत सरकार, संरक्षण मंत्रालय किंवा सरकारी न्यूज चॅनेल्स—यांच्याकडूनच माहिती घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

WhatsApp, Facebook यांसारख्या माध्यमांवर येणाऱ्या संदेशांवर लगेच विश्वास ठेवू नये, तसेच कुणीही खोटी माहिती पसरवत असल्यास त्यावर प्रचलित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

नागरिकांनी जबाबदारीने वागून अफवा थांबवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन धाड पोलीस प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top