mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

एल.टी.टी. बल्लारशहा रेल्वेला शेगांव येथे थांबा मंजुर  : Stop at Shegaon Sanctioned for LTT-Ballarshah Train

शेअर करा :

Stop at Shegaon Sanctioned for LTT-Ballarshah Train : एल.टी.टी. बल्लारशहा रेल्वेला शेगांव येथे थांबा मंजुर खामगांव-जालना रेल्वे मार्गाचीही गोड बातमी लवकरच मिळणार-केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आज भेट.

Stop at Shegaon Sanctioned for LTT-Ballarshah Train

बुलढाणा (प्रतिनीधी)

संतनगरी शेगांव रेल्वे मार्गाने नियमीत धावणाऱ्या परंतु थांबा नसणाऱ्या एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेसला शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा मंजुरी केल्याप्रकरणी केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची आज केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले. तर खामगांव-जालना रेल्वे मार्गा संदर्भात गोड बातमी लवकरच देऊ असे सुचक वक्तव्य केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी चर्चेदरम्यान केले. त्यामुळे खामगांव-जालना रेल्वे मार्गाबद्दल केंद्र सरकारची सकारात्मकता दिसुन आली. या रेल्वे मार्गासंदर्भात अंतिम मंजुरातीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Stop at Shegaon Sanctioned for LTT-Ballarshah Train

विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या बुलढाणा जिल्हयातील संत नगरी शेगांव येथे दररोज देशभरातुन लाखो भाविक येत असतात. शेगांव रेल्वे मार्गावरील नियमीत धावणाऱ्या एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेस सह इतर 3 सुपर फास्ट एक्स्प्रेसला शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी गेल्या महिन्यामध्ये केंद्रिय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन केली होती. त्यातील एल.टी.टी. बल्लारशहा एक्स्प्रेसला रेल्वे मंत्रालयाच्या वतीने थांबा मंजुर करण्यात आला आहे. आज 27 मार्च ला केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन बल्लारशहा एक्स्प्रेसला थांबा दिल्याबद्दल केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले याचवेळी खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करत असतांनाच त्यांनी रेल्वे मंत्रालय या रेल्वे मार्गासंदर्भात वेगाने काम करत असुन लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी देऊ असे सुचक विधान त्यांनी केले.

खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे मंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक भुमिका दर्शविल्याने खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी खामगांव-जालना रेल्वे मार्गाबद्दल विस्तृत चर्चाही यावेळी मंत्रीमहोदयांसोबत केली. इंग्रज काळापासुन हा रेल्वे महामार्ग प्रलंबित असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हारेल्वे मार्ग करण्याचे आश्वासन बुलढाणा जिल्हयातील जनतेला दिले असल्याचे सांगुन या रेल्वे मार्गामुळे मध्य रेल्वे व दक्षिण रेल्वे जोडल्या जाणार आहे. हा रेल्वे मार्ग व्हावा हि जिल्हयातील नागरीकांची जनभावना आहे. असेही त्यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चेत सांगीतले. केंद्रिय रेल्वे मंत्र्यांनी दर्शविलेल्या सकारात्म भुमिकेमुळे या रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरात मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top