Rajasthan Royals became Washims : मूळ येथील रहिवासी तथा जलझालेले कैलास (कॅल) सोमाणी सीईओ असलेल्या कंपनीने आयपीएल स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघ तब्बल १५ हजार ३०० कोटी रुपयांत खरेदी केला आहे.


कैलास सोमाणी उर्फ कॅल सोमाणी यांनी खरेदी केली टीम
विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा
वाशीम : मूळ येथील रहिवासी तथा जलझालेले कैलास (कॅल) सोमाणी सीईओ असलेल्या कंपनीने आयपीएल स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघ तब्बल १५ हजार ३०० कोटी रुपयांत खरेदी केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे मागासलेला विदर्भ म्हणून नाके मुरडणाऱ्यांना चाप बसवत वाशीमचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.
१५ ऑगस्ट १९७४ रोजी वाशीम येथे जन्मलेल्या कैलास सोमाणी यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. वडील नंदकिशोर सीताराम सोमाणी यांच्या निधनानंतर केवळ १६ व्या वर्षीच त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. लहानपणापासून क्रिकेटची आवड असली तरी मर्यादित साधनांमध्ये त्यांनी शिक्षणावर भर दिला. वाश्रीम येथील मुळीबाई चरखा विद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेगावच्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी संगणक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यांचे मोठे बंधू सुबोध सोमाणी हे अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. कैलास यांनी देखील अमेरिकेत जाऊन आयोवा राज्यातील सीडर रॅपिड्स येथे नोकरीची सुरुवात केली. पुढे ॲरिझोनात स्वतःचा व्यवसाय उभारून त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश संपादन केले. अनेक कंपन्यांचे ते संस्थापक असून, अनेक जागतिक कंपन्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. क्रिकेटप्रेम जपत त्यांनी अकोला-नागपूर महामार्गावरील तळेगाव (श्यामजीपंत) येथे क्रिकेट अकादमीची स्थापना केली असून, येथील गरजू खेळाडूंना संधी मिळावी म्हणून एक कोटी रुपयांची मदतही केली आहे.
अमेरिकेत कैलास हे नाव वाशिमकरांसाठीच नव्हेतर विदर्भासाठी भूषणावह हे. कैलास सोमाणी यांचे बालपण वाशीम शहरात गेले आहे. बालपणापासूनच खूप मेहनती, हुशार होते. अमेरिकेत स्थायिक झाले असले तरी वाशिमशी व विदर्भाशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. कैलास यांनी जागतिक स्तरावर घेतलेली झेप निश्चितच वाशिमकरांसाठी भूषणावह आहे, अशी प्रतिक्रिया कैलास यांचे चुलत भाऊ सुरेशचंद्र सोमाणी यांनी दिली. उच्चारणाच्या सोयीसाठी ‘कॅल सोमाणी’ असे प्रचलित झाले. सोलापूर हे त्यांचे सासर असून, त्यांना अर्जुन व सानिया ही दोन अपत्ये आहेत. मुलगा अर्जुन हा १४ वर्षांखालील गटात गोल्फमध्ये विश्वविजेता ठरला आहे.
वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातील जवाहर कॉलनी येथे त्यांचे वडिलोपार्जित घर असून, कुटुंबीयांचे शहराशी अजूनही नाते घट्ट आहे. साध्या कुटुंबातून जागतिक यशाच्या शिखरावर पोहोचलेले कॅल (कैलास) सोमाणी हे आज तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.
सोमाणी हे स्कॉट्सडेल (अमेरिका) येथील उद्योजक आहेत. त्यांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एड-टेक आणि डेटा प्रायव्हसी या क्षेत्रांत १५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. ते इंट्राएज (IntraEdge) आणि ट्रूयो (Truyo) या कंपन्यांचे संस्थापक आहेत आणि एआय गवर्नन्सच्या क्षेत्रात एक प्रमुख आवाज मानले जातात.
खेळ जगतात त्यांचा सहभागही वेगाने वाढत आहे. ते मोटर सिटी गोल्फ क्लबचे सह-मालक आहेत आणि टीजीएल गोल्फ लीग तसेच टीएमआरडब्ल्यू स्पोर्ट्स सारख्या उभरत्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली आहे. सोमानी यांच्या कन्सोर्टियमला अनेक हाय-प्रोफाइल गुंतवणूकदारांचा पाठिं कॉलबा आहे.


