mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मुख्यमंत्रीसाहेब, हवाई पाहणी करूनच ठरवा इंधन तुटवडा आहे का? : Chief Minister, please conduct an aerial survey to determine whether there is a fuel shortage

शेअर करा :

Chief Minister, please conduct an aerial survey to determine whether there is a fuel shortage : राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल व गॅसचा तुटवडा आहे काय? याची पालकमंत्र्यांसोबत हवाई पाहणी करावी, असे पत्र माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

Chief Minister, please conduct an aerial survey to determine whether there is a fuel shortage
सुबोध सावजी

वाढवलेले दर परवडणारे नसताना दोन रुपये कमी करून फायदा काय? : माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचा सवाल

मेहकर : युद्धजन्य परिस्थितीमध्ये जनता हैराण झाली आहे. रांगा लावूनही पेट्रोल, डिझेल मिळत नसल्याने वाहनांमध्ये टाकायचे काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव कमी केल्याचे सांगितले. वाढवलेल्या भावामध्ये दोन रुपये कमी करणे म्हणजे जनतेचा कोणते भले झाले, असा सवाल करतानाच राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल व गॅसचा तुटवडा आहे काय? याची पालकमंत्र्यांसोबत हवाई पाहणी करावी, असे पत्र माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

Chief Minister, please conduct an aerial survey to determine whether there is a fuel shortage
या सिलिंडरसाठी लागलेल्या रांगा

पेट्रोलपंपांसह गॅस एजन्सीजवर लागलेल्या रांगा पाहून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन सोशल मीडियाद्वारे आवाहन केले की, आपण व प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सोबत घ्यावे व हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी करावी. २७ मार्च रोजी आपण मुंबई येथून महाराष्ट्राच्या जनतेला सांगितले की, पेट्रोलमध्ये दोन रुपये दर कमी करण्यात आले. परंतु जे दर वाढलेले आहेत, तेच परवडणारे नाहीत. तसेच राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल व गॅसची इतकी कमतरता आहे हे आपण हवाई पाहणी केल्यास पेट्रोल पंपावर लागलेल्या रांगा, समृद्धी महामार्गावर उभे असलेली वाहने, त्याचप्रमाणे प्रत्येक गावात घरगुती गॅसची कमतरता हे आपणास लक्षात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपण आवाहन केले की, राज्यातून इंधनाचा तुटवडा भासू देणार नाही. वाहनधारक वाहनात बसेल एवढेच इंधन घेतो. त्यामुळे विकत घेणारा साठा करू शकत नाही, असा दावाही सावजी यांनी केला.

राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या इतकी हलाखीची परिस्थिती आहे की अशा परिस्थितीत पेट्रोल, डिझेल व गॅस साठविणे शक्य नाही. आमची मागणी मान्य करून महाराष्ट्रासह राज्यातील जनतेला दिलासा द्यावा; अन्यथा राज्यामध्ये आक्रोश वाढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही सावजी यांनी दिला आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top