mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

IAS विशाल नरवाडे यांचा राज्यस्तरीय गौरव : State-Level Honor for IAS Vishal Narwade

शेअर करा :

State-Level Honor for IAS Vishal Narwade : प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी आयएएस विशाल नरवाडे यांचा गौरव

State-Level Honor for IAS Vishal Narwade

राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्याचे  सुपुत्र  आयएएस विशाल नरवाडे यांना राज्यस्तरीय सर्वोत्तम सीईओ पुरस्कार प्रधान करण्यात आला 

मुंबई :

आज मंत्रालय मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र, आयएएस अधिकारी विशाल  नरवाडे यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून सन्मानित करण्यात आले.
प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नरवाडे यांनी उल्लेखनीय कार्य केले. विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांपर्यंत सेवा जलदगतीने पोहोचवणे आणि प्रशासनात नवकल्पना राबविणे या बाबींमुळे त्यांचे कार्य राज्यभरात उठून दिसले.
या सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या नावाला राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळाले असून, जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या यशामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top