Driver nap; Two pilgrims killedDriver napping; Two tourists hit by black magic : सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअपला चालकाला डुलकी लागून अपघात झाला. यात दोघे ठार झाले, तर १५ जण जखमी झाले.

पिकअप उलटून दोन ठार, १५ जखमी : मेहकर – चिखली मार्गावर नांद्रा धांडे फाट्यावर भीषण अपघात
आसिफ शाह
मेहकर : अहमदपूर येथून सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर २९ मार्च २०२६ च्या सकाळी सहा वाजता काळाने झडप घातली. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव वेगातील पिकाअप उलटून दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. यामध्ये काही महिला, लहान मुले आणि पुरुषांचा समावेश आहे. मेहकर ते चिखली मार्गावरील नांद्रा धांडे गावाजवळ हे भीषण दुर्घटना घडली.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील बागवान बिरादरीचे (महादेशा ब्रेकिंग ) लहान मुले महिला आणि पुरुष असे २५ हून अधिक भाविक सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. नांद्रा धांडे फाट्याजवळ चालकाला डुलकी लागल्याने पिकअप वाहन उलटले. हा अपघात एवढा भीषण होता की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. (महादेशा ब्रेकिंग) तसेच पंधरा जण जखमी झाले. मृतांमध्ये एक ३५ वर्षीय तरुण आणि सोळा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
काही जखमींना मेहकर ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर काहींना प्रकृती गंभीर असल्याने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


घटनास्थळी एकच आक्रोश
अपघात घडताच पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या भाविकांनी एकच आक्रोश केला. महिला आणि लहान मुले भेदरून गेली होती.


