Mandar Bhekar elected as BJP Legislative Assembly chief : प्रदेश भाजपच्या वतीने मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या SIR (Special Intensive Revision) अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

पक्ष, संघटन मजबूत करण्याची जबाबदारी
बुलढाणा : प्रदेश भाजपच्या वतीने मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या SIR (Special Intensive Revision) अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये बुलढाणा विधानसभा क्षेत्रासाठी मंदार बाहेकर यांची BLA-1 विधानसभाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ही नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
मंदार बाहेकर हे पक्षाचे जिद्दी, कर्तव्यनिष्ठ आणि तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. भाजप शहराध्यक्ष, भाजप शहर युवा व किसान मोर्चामध्ये सरचिटणीस पदावर कार्य करत त्यांनी संघटन विस्तारात मोलाची भूमिका बजावली आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या मंदार बाहेकर यांनी गोवा विधानसभा निवडणूक, बूथ बळकटीकरण मोहीम तसेच विविध विस्तार योजनांमध्ये आघाडीवर राहून काम केले आहे.
पक्षाच्या प्रत्येक स्तरावर दिलेल्या जबाबदाऱ्यांना शंभर टक्के न्याय देत, संघर्षातून आणि सातत्यपूर्ण मेहनतीतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मंदार बाहेकर यांच्या कामाची दखल घेतच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची विधानसभा पातळीवरील जबाबदारी सोपवली आहे. ही नियुक्ती त्यांच्या कार्याची पावती असून, तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
सामाजिक क्षेत्रातही त्यांनी कोरोना काळात गरजूंना मदत, रक्तदान शिबिरे व विविध जनसेवा उपक्रमांद्वारे समाजाशी घट्ट नाळ जपली आहे.
BLA-1 विधानसभा प्रमुख म्हणून मंदार बाहेकर यांच्याकडून मतदार यादी पुनर्निरीक्षण, बूथ स्तरावर भक्कम संघटन उभारणे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहे.
या नियुक्तीमुळे बुलढाणा विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम होऊन आगामी निवडणुकांसाठी मजबूत आणि विजयी पायाभरणी होणार, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.


