mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शिवसेना मजबूत करण्यासाठी एकजुटीचा मंत्र : The Mantra of Unity to Strengthen the Shiv Sena

शेअर करा :

The Mantra of Unity to Strengthen the Shiv Sena : शिवसेना संघटन बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करा – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन

The Mantra of Unity to Strengthen the Shiv Sena

५ एप्रिलला चिखलीत भव्य पक्षप्रवेश सोहळा पदाधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना.

बुलढाणा : – शिवसेना पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून आपल्या सर्कल व प्रभागांमध्ये पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले. तसेच येत्या ५ एप्रिल रोजी चिखली येथे होणाऱ्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालय येथे आज (२९ मार्च) तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

The Mantra of Unity to Strengthen the Shiv Sena

यावेळी व्यासपीठावर शिवाजीराव देशमुख, मायाताई म्हस्के, गजानन मोरे, विलास घोलप, शरद हाडे, वैशाली कपील खेडेकर, तसेच वसंतराव गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना जाधव म्हणाले की, विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व सदस्य एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. अशा सर्वांना सोबत घेत पक्ष अधिक बळकट करावा. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या कार्यकर्त्यांच्या बळावर लढवल्या जाणार असून, प्रत्येकाने आपल्या स्तरावर संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा.

केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे मित्रपक्षांबद्दल संयमित भाषा वापरावी, मतभेद टाळून एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी प्रथम स्वतःची ताकद वाढवून आपल्या प्रभागात पक्ष विस्तारासाठी सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, किसान आघाडी आदी घटकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top