mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धोत्रा शिवारात नशेचे पीक : Intoxication crop in Dhotra Shivara

शेअर करा :

Intoxication crop in Dhotra Shivara : धोत्रा शिवारात नशेचे पीक

Intoxication crop in Dhotra Shivara

अफूच्या शेतीवर धाड : ४४ लाखांची झाडे जप्त

अंढेरा : देऊळगाव राजा व चिखली तालुक्यातील काही भागांमध्ये गेल्या काही महिन्यांत अफूची लागवड केली जात असल्याची बाब पोलीस कारवाईनंतर समोर आली. मात्र, अफूचे आंतरपीक घेण्याचा प्रकार वाढतच असल्याचे दिसून येत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा येथील एका शेतकऱ्याने धोत्रा नंदई शिवारात लागवड केलेली अफूची शेती उद्ध्वस्त केली. या कारवाईत ४४ लाख ५० हजार रुपये किमतीची १ क्विंटल ११ किलो वजनाची झाडे बोंडासह जप्त करण्यात आली.

अफूची नशिली शेती करणाऱ्या संजय तुकाराम चेके या शेतकऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी चिखली तालुक्यातील मेरा खुर्द शिवारातही पोलिसांनी अफूची लागवड करणाऱ्यास अटक केली होती. देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा येथील शेतकरी अफूची शेती करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्यानुसार एलसीबीसह अंढेरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत धाड घातली. धोत्रा नंदई शिवारातील गट नंबर ३६८ मध्ये अफूचे पीक घेतले जात असल्याचे आढळले.

देऊळगाव राजाच्या नायब तहसीलदार सायली जाधव, सहायक कृषी अधिकारी कडू, महसूल अधिकारी एम.के. सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी सुरेश शेळके यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय प्रताप बाजड, स्थानिक गुन्हे शाखेचे दिगंबर कपाटे, पोहेकॉ पुरुषोत्तम आघाव, पोलीस शिपाई वनिता शिंगणे, सनगाळे, मनोज खरडे, पूजा सावळे, सतीश नाटेकर, चालक समाधान टेकाळे तसेच अंढेरा पोलिस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार दिनेश घुगे, सिद्धार्थ सोनकांबळे, बीट जमदार मारुती कायंदे, पंढरी नेमाने यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top