mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डॉ. सय्यद बशीर यांना डॉक्टर असोसिएशनतर्फे श्रद्धांजली : Dr. Sayyad Bashir paid tribute by the Doctors Association

शेअर करा :

Dr. Sayyad Bashir paid tribute by the Doctors Association : डॉ. सय्यद बशीर यांना डॉक्टर असोसिएशनच्या वतीने ३१ मार्च रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Dr. Sayyad Bashir paid tribute by the Doctors Association
डॉ. सय्यद यांना श्रद्धांजली वाहताना डॉक्टर.
Dr. Sayyad Bashir paid tribute by the Doctors Association
डॉ. सय्यद

बुलढाणा : वैद्यकीय क्षेत्रात सेवा देतानाच सामाजिक बांधिलकी जोपासून मानवताधर्माचा संदेश देणारे दिवंगत डॉ. सय्यद बशीर यांना डॉक्टर असोसिएशनच्या वतीने ३१ मार्च रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी डॉ. सय्यद यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९२ वर्षांचे होते. उतारवयात ते वैद्यकीय क्षेत्रापासून अलिप्त राहिले. सय्यद यांच्या कार्याच्या आठवणींना उपस्थित डॉक्टरांनी उजाळा दिला. तसेच आदरांजली अर्पण केली.

यावेळी डॉ. संतोष खेडेकर, डॉ. तौसिफ शेख, डॉ. तातेड, डॉ. कानडजे, डॉ. कारले, अकबर, भूषण भोंडे, मालवे, बोरसे, नीलेश सोनुने, चाटे, विष्णू सोनुने, श्याम भोंडे, डॉ. शाहरुख, डॉ. मांटे, डॉ. शिंबरे, डॉ. अझहर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top