mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रिपाइंच्या वतीने आमदार संजयभाऊ गायकवाड व नगराध्यक्षा पूजा गायकवाड यांचा भव्य सत्कार : Grand Felicitation of MLA Sanjaybhau Gaikwad and Council President Pooja Gaikwad on behalf of the RPI.

शेअर करा :

Grand Felicitation of MLA Sanjaybhau Gaikwad and Council President Pooja Gaikwad on behalf of the RPI.: रिपाइंच्या वतीने आमदार संजयभाऊ गायकवाड व नगराध्यक्षा पूजा गायकवाड यांचा भव्य सत्कार

Grand Felicitation of MLA Sanjaybhau Gaikwad and Council President Pooja Gaikwad on behalf of the RPI.
पुष्पगुच्छ देऊन दोन्ही नेत्यांचा सत्कार करण्यात आला

बुलढाणा : मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला “राजमाता जिजाऊ नगर” असे नामकरण करण्याची मागणी विधानसभेत लावून धरल्याबद्दल आणि बुलडाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बहुमताने निवडून आल्याबद्दल आमदार संजयभाऊ गायकवाड तसेच नगराध्यक्षा पूजा संजय गायकवाड यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

मातृतीर्थ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन दोन्ही नेत्यांचा सन्मान करण्यात आला. बुलडाणा शहराच्या विकासासाठी केलेल्या कामांमुळे नगराध्यक्षा म्हणून पूजा गायकवाड यांची निवड झाल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. तसेच, आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत सर्व समाजघटकांना सोबत घेत काम केल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमाला रिपाइंचे विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बाबासाहेब जाधव, भैयासाहेब पाटील, भाऊसाहेब सरदार, नबाब मिर्झा बेग, रामदास कहाळे, प्रा. पठाण, वंदना वाघ, दिलीप काकडे, शरद खरात, प्रकाश पाटील (म्हस्के), संजय वाकोडे, राजेश सरकटे, आशा वानखडे, विजय साबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता.

सत्काराला उत्तर देताना आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी सांगितले की, “कोणत्याही सामाजिक व धार्मिक कार्यासाठी मी नेहमीच तुमच्या पाठीशी तन-मन-धनाने उभा राहीन. जनतेसाठी माझे दार २४ तास खुले आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top