mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डॉ. प्रवीणकुमार देवरे सांभाळणार मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचा कारभार : Dr. Praveen Kumar Deore will take charge of the administration of Matru Tirtha Buldhana district

शेअर करा :

Dr. Praveen Kumar Deore will take charge of the administration of Matru Tirtha Buldhana : डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची बुलढाणा जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. तर डॉ. किरण पाटील यांची पुणे येथे पशुसंवर्धन आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Deore will take charge of the administration of MatruTirth Buldhana district

नवे जिल्हाधिकारी म्हणून घेणार सुत्रे हाती : किरण पाटील यांची देवरे यांच्या जागी पुण्याला बदली 

बुलढाणा : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याची सूत्रे लवकरच डॉ. प्रवीणकुमार देवरे हाती घेणार आहेत. डॉ. किरण पाटील यांची राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त म्हणून पुणे येथे बदली झाली असून, याच पदावर कार्यरत देवरे हे बुलढाणा जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.

डॉ. प्रवीणकुमार देवरे हे महाराष्ट्र कॅडरचे २०१३ बॅचचे आयएसआय अधिकारी आहेत. सप्टेंबर २०२४ पासून ते महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त म्हणून कार्यरत होते. यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पुणे जिल्हा जाती प्रमाणपत्र सत्यापन समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणूनही त्यांनी कामकाज सांभाळले आहे.

२५ आयएएस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये डॉ. देवरे व डॉ. पाटील यांचा समावेश असून, त्यांचा एकमेकांच्या जागी पद बदल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top