mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शेतीची मोफत नांगरटी : Free agricultural plough

शेअर करा :

Free agricultural plough : शेतकरी विधवा महिलांना शेती कसून उत्पन्न वाढविण्यासाठी हातभार लावण्यासाठी शैलेश सावजी यांनी सामाजिक बांधिलकी जपत शेतीची नांगरटी मोफत करून देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.

Free agricultural plough
शैलेश सावजी

विधवा शेतकरी महिलांसाठी शैलेश सावजी यांची सामाजिक बांधिलकी

मेहकर : शेतकरी विधवा महिलांना शेती कसून उत्पन्न वाढविण्यासाठी हातभार लावण्यासाठी शैलेश सावजी यांनी सामाजिक बांधिलकी जपत शेतीची नांगरटी मोफत करून देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे शेतकरी विधवा महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पात्र महिलांना त्यांच्या शेतजमिनीवर कोणताही आर्थिक भार न टाकता सुमारे १ हेक्टर (२.५ एकर) क्षेत्रावर मोफत नांगरणी करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम स्वत:च्या खर्चातून राबविला जात आहे. यात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वावर काम केले जात आहे.

Free agricultural plough
संग्रहित छायाचित्र

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. लाभार्थी महिला ही डोणगाव परिसरातील असावी, ती अल्पभूधारक असावी तसेच तिच्याकडे नियमित उत्पन्नाचे दुसरे साधन नसावे. याशिवाय, तिची मुले शिक्षण घेत असावीत, अशी अटही ठेवण्यात आली आहे. या निकषांमुळे खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र महिलांपर्यंत मदत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनेक विधवा महिलांना दिलासा मिळणार आहे. आजघडीला आर्थिक अडचणींमुळे शेती करणे कठीण झाले आहे.

 

पिस्तूलची विक्री; तीन तस्कर एलसीबीच्या जाळ्यात : Pistol sale; Three smugglers caught by LCB

 

अनेक कुटुंबे पुन्हा उभारी घेतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आजच्या काळात स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कार्य करणारे हात कमी होत चालले आहेत. अशा परिस्थितीत शैलेश सावजी यांनी पुढे येत उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे. समाजात सकारात्मक बदल घडविणारे ठरत आहे. गरीब, गरजू आणि विशेषत: विधवा महिलांसाठी उभा राहिलेला हा मदतीचा हात खऱ्या अर्थाने माणुसकीची जाणीव करून देणारा आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top