One killed, one injured in accident : मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नांदुऱ्यातील हॉटेल सावजीसमोर झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जखमी झाला.
नांदुऱ्याजवळ अपघात
बुलढाणा : मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नांदुऱ्यातील हॉटेल सावजीसमोर झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जखमी झाला. या प्रकरणी तक्रार विलंबाने दाखल झाल्याने जलंब पोलिसांत ४९ दिवसांनी गुन्हा नोंदविण्यात आला.
शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील चालक रामदास शांताराम पारसकर (वय ५०)हे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी एकच्या सुमारास एमएच-२८-बीबी-८१२८ क्रमांकाची टाटा इंडिका कार घेऊन नांदुरा येथे जात होते. नांदुरा शहरात प्रवेश करत असताना हॉटेल सावजीसमोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात रामदास संपत हरमकार यांचा मृत्यू झाला. तर चालक जखमी झाला. अपघातानंतर मानसिक स्थिती बरी नसल्याने चालकाने ३ एप्रिलला तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.


