Anandi Maharaj Cup 2026 : आनंदी महाराज चषक 2026ग्रामीण क्रिकेटचा जल्लोष; ‘एक गाव – एक संघ’ संकल्पनेतून रंगणार थरार

माळवंडी :
ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे “आनंदी महाराज चषक 2026” या भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक गाव – एक संघ’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा गावागावातील खेळाडूंना एकत्र आणत क्रीडाप्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून तब्बल ₹41,000 ज्ञानेश्वर पुंडलिक चव्हाण – सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते, माळवंडी यांच्याकडून देण्यात येणार आहे. तर द्वितीय पारितोषिक ₹21,000 माजी सैनिक नितीन दादा राजपूत – शिवसेना तालुकाप्रमुख, बुलढाणा आणि तृतीय पारितोषिक ₹11,000 दादाराव भाऊ राऊत – पंचायत समिती, रायपूर सर्कल असे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
आणखी बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंकला टच करा https://mahadesha.com/
स्पर्धेत केवळ 24 ग्रामीण संघांना प्रवेश दिला जाणार असून प्रत्येक गावातून एकच संघ सहभागी होणार आहे. प्रत्येक संघात 11 खेळाडू अनिवार्यपणे त्याच गावातील असतील. सामने 6 षटकांचे राहणार असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांनुसार खेळविले जाणार आहेत.
स्पर्धेची प्रवेश फी ₹4000 ठेवण्यात आली असून नोंदणीची अंतिम तारीख 11 एप्रिल 2026 आहे. संघाचा प्रवेश निश्चित करण्यासाठी पूर्ण फी व 15 खेळाडूंची यादी राशन कार्ड क्रमांकासह देणे बंधनकारक आहे.
स्पर्धेत शिस्त आणि नियमांना विशेष महत्त्व देण्यात आले असून पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाद घालणाऱ्या संघावर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सर्व खेळाडूंना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक ला टच करा https://mahadesha.com/
या स्पर्धेसाठी बॉल बॉक्स प्रायोजक म्हणून दत्ताभाऊ चव्हाण माजी सरपंच, माळवंडी, स्टंप प्रायोजक म्हणून संजय वाघ माजी सरपंच, माळवंडी आणि पाण्याची व्यवस्था गजानन खडके यांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक संघांनी प्रशांत जाधव (8668292435), ज्ञानेश्वर चव्हाण (9834616238) किंवा अनिल सोनूने (7774919832) यांच्याशी संपर्क साधावा.
ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना आपली कला दाखवण्याची ही सुवर्णसंधी ठरणार असून स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


