Senior Ambedkarite activist Balkrishna Dada Ingle felicitated by the RPI (Athawale). : रिपाइ (आठवले) तर्फे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण दादा इंगळे यांचा सत्कार

बुलढाणा (प्रतिनिधी) :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पॅंथर म्हणून ओळखले जाणारे बाळकृष्ण दादा इंगळे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी हा सत्कार सोहळा पार पडला. रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचे एकनिष्ठ सहकारी म्हणून ओळख असलेले इंगळे यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळ, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांसाठी कार्य केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी अग्रभागी राहून सहभाग घेतला होता. विद्यार्थी चळवळीपासूनच त्यांनी गोरगरीब, होतकरू व निराश्रितांसाठी सतत मदतीचा हात पुढे केला आहे.
आणखी बातम्या वाचन्यासाठी खाली लिंकला टच करा ://mahadesha.com/
यावेळी बुलढाणा जिल्हा रिपाईचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी इंगळे यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या कार्याचा गौरव करत शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच सामाजिक, राजकीय व धार्मिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख वैभव दादा शिरसाठ तसेच रिपाईचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी इंगळे यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या


