mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

तीन भावंडांच्या मृत्यूने हळहळला जिल्हा : The death of three siblings has shaken the district

शेअर करा :

The death of three siblings has shaken the district : एकाच कुटुंबात आईसह चार मुलांना विषबाधा झाली. यातील तीन मुलांचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला.


चिमुकल्या बहिणभावाच्या मृत्यूनंतर  तिसरी मुलगीही दगावली : धाडच्या वसीम जमादार यांच्यावर कुटुंबीयांवर कोसळले दुःखाचे आभाळ


The death of three siblings has shaken the district
मृतक फातिमा, मशिरा व अली

धाड : एकाच कुटुंबात आईसह चार लहान मुलांना विषबाधा झाल्याने दोन बहिणींसह एका लहान या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवार, ६ एप्रिल रोजी दुपारी बहीण व भावाचा मृत्यू झाला, तर सायंकाळी पावणेआठच्या सुमारास आणखी एका मुलीचा मृत्यू झाला. आई आणि एका मुलीवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने वसीम जमादार यांच्या कुटुंबीयांवर मोठे दुःखाचे आभाळच कोसळले. या घटनेने धाडवासीय शोकमग्न झाले असून, अख्खा जिल्हा हळहळला आहे.

मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय ७) व फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८) या तीन बहीण-भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४) व मुलगी अश्मिरा वसीम जमदार (वय ३) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धाड येथील रहिवासी मोहंमद वसीम जमादार यांची पत्नी अफरीन यांच्यासह तीन मुली व एक मुलगा अशा पाच जणांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू होता. सोमवार, ६ एप्रिल २०२६ च्या सकाळी विषबाधा वाढत गेल्याने सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने अली व मशिरा यांचा मृत्यू झाला. आई व दोन मुलींवर बुलढाणा येथे हलविण्यात आले.

आई अफरीन यांच्यावर खासगी रुग्णालयात तसेच मुलगी फातिमा व अश्मीरावर बालरोगतज्ज्ञाकडे उपचार सुरू होते. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास उपचार सुरू असताना दोघींपैकी एक फातिमा हिची प्राणज्योत मालवली. विषबाधेने तीन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ही विषबाधा नेमकी कशी झाली याबद्दल अद्याप कुठलीच माहिती समोर आली नाही. अन्नातून विषबाधा झाली असावी, अशी प्राथमिक माहिती आहे. तसेच विषबाधेचे आणखी काही कारण असावे, अशी चर्चा धाडवासीयांमध्ये आहे.

 

अंत्यविधीवेळी गहिवरले ग्रामस्थ

अली व मशीरा या दोघांचे दुपारी शवविच्छेदन  झाल्यानंतर दुपारी त्यांचे पार्थिव घरी नेण्यात आले.  सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top