Robust Performance of the CMEGP Scheme in Buldhana District : बुलढाणा जिल्ह्यात CMEGP योजनेची दमदार कामगिरी १००% उद्दिष्ट पूर्ण

बुलढाणा : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत बुलढाणा जिल्ह्याने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्याने निर्धारित १०० टक्के मंजुरीचे उद्दिष्ट पूर्ण करत अमरावती विभागासह राज्यस्तरावरही आपली भक्कम कामगिरी कायम राखली आहे. या यशामुळे स्थानिक उद्योजकतेला मोठे आर्थिक बळ मिळाले असून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे.
जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या सर्व ७८० अर्जांना बँकांकडून मंजुरी मिळाल्याने हा टप्पा गाठणे शक्य झाले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. प्रमोद लांडे यांचे अभिनंदन करण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे टच करा https://mahadesha.com/
यावेळी कामगार मोर्चा बुलढाणा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, शासकीय योजना प्रचार व प्रसार समितीचे जिल्हा संयोजक अंबादास घेवंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी अनिल वाघमारे उपस्थित होते.


