mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

विषबाधित मायलेकीला छत्रपती संभाजीनगरला हलविले : Poisoned Mother and Daughter Shifted to Chhatrapati Sambhajinagar

शेअर करा :

Poisoned Mother and Daughter Shifted to Chhatrapati Sambhajinagar : विषबाधित मायलेकीला छत्रपती संभाजीनगरला हलविले

Poisoned Mother and Daughter Shifted to Chhatrapati Sambhajinagar

बुलढाणा : 

विषबाधा झाल्याने धाड येथील तीन बहीण-भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. बुलढाण्यात उपचार घेत असलेल्या मायलेकीला आता पुढील उपचाराकरिता छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

आणखी बातमी वाचण्यासाठी खालील लिंक ला टच करा https://mahadesha.com/

 

धाड येथे एकाच कुटुंबातील आई आणि चार मुलांना विषबाधा झाल्याने बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. यातील मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय ७) व फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८) या तीन बहीण-भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४) व अश्मिरा वसीम जमदार (वय ३) या दोघींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते.

आधीच कुटुंबातील तीन चिमुकले विषबाधेचे बळी ठरले. आता आई आणि मुलीचे प्राण वाचविण्यासाठी नातेवाइकांनी त्यांना सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात भरती केले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top