A Resplendent Celebration of Enlightenment in Shelodi : शेलोडीत प्रबोधनाचा जाज्वल्य सोहळा; कवी गोविंद पोलाड यांच्या बेधुंद कार्यक्रमाची पर्वणी

चिखली प्रतिनिधी: तालुक्यातील शेलोडी येथे येत्या दि. १० एप्रिल २०२६ (शुक्रवार) रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रबोधनाचा एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे. सम्राट युवा मंच, शेलोडी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रख्यात प्रबोधनकार व बेधुंदकार कवी गोविंद पोलाड (अमरावती) आपल्या विचारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देत सामाजिक जागृतीचा संदेश दिला जाणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. सुभाष राऊत (चिखली) लाभणार असून, अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर बनसोडे (ग्रा.प. सदस्य, शेलोडी) राहणार आहेत. तसेच आयु. कैलास गवई उपाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे टच करा https://mahadesha.com/
समाजप्रबोधन, परिवर्तन आणि जागृतीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील धम्म उपासक, उपासिका व बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
लोणार येथे भव्य योग महोत्सव : Grand Yoga Festival at Lonar
हा कार्यक्रम केवळ मनोरंजन नसून विचारांची क्रांती घडवणारा ठरणार असून, शेलोडी परिसरात एक प्रेरणादायी वातावरण निर्माण होणार आहे.


