mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : A Golden Opportunity for Educated Unemployed Individuals

शेअर करा :

A Golden Opportunity for Educated Unemployed Individuals : सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी; ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026’चा तिसरा टप्पा जाहीर

A Golden Opportunity for Educated Unemployed Individuals

बुलढाणा : देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 (PMIS) च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून, दि. 12 एप्रिल 2026 पासून नव्या नियमांसह योजना अधिक आकर्षक करण्यात आली आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि तरुणांचे कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणारी ही योजना आता अधिक व्यापक बनली आहे.

👉 समृद्धीवर कंटेनररुपी काळाने घेतला आठ कामगार महिलांचा बळी : Eight working women killed in 

 योजनेची ठळक वैशिष्ट्ये

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9,000 रुपये विद्यावेतन

DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट खात्यात रक्कम जमा

18 ते 25 वर्षे वयोगट पात्र

10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर तसेच Post Graduate आणि MBA विद्यार्थ्यांनाही संधी

इंटर्नशिप कालावधी 6 ते 9 महिने

रुजू झाल्यावर ₹6,000 एकरकमी सानुग्रह अनुदान

👉 लोणार येथे भव्य योग महोत्सव : Grand Yoga Festival at Lonar

नोंदणी प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी:

pminternship.mca.gov.in

एका उमेदवाराला 3 इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची मुभा

उमेदवार सध्या पूर्णवेळ नोकरीत नसावा

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹12 लाखांपेक्षा कमी असावे

कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावा

या योजनेद्वारे सेमीकंडक्टर, रिन्यूएबल एनर्जी, आयटी यांसारख्या 20 पेक्षा अधिक क्षेत्रांतील 300+ नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

👉 निवृत्तीला आलेल्या मास्तरचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे : Obscene gestures with masters students

जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०७२६२-२४२३४२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top