mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गुणवंत खेळाडूंना सुवर्णसंधी : A Golden Opportunity for Talented Athletes

शेअर करा :

A Golden Opportunity for Talented Athletes : गुणवंत खेळाडूंना सुवर्णसंधी! शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

A Golden Opportunity for Talented Athletes

बुलढाणा : राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी केंद्रांसाठी सन 2026-27 या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 19 वर्षांखालील खेळाडूंना सरळ प्रवेश तसेच कौशल्य चाचणीद्वारे निवासी प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे.

राज्यातील अमरावती, नागपूर, अकोला, गडचिरोली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे ही प्रबोधिनी केंद्रे कार्यरत असून, विविध खेळांमध्ये नव्या प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे.

 

 आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

 

या प्रबोधिनींमध्ये आर्चरी, ज्युदो, हँडबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शूटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स, जलतरण, फुटबॉल, ट्रायथलॉन आणि सायकलिंग अशा एकूण 16 क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी किंवा पदक विजेते खेळाडूंची तज्ज्ञ समितीद्वारे निवड केली जाणार असून, वैद्यकीय चाचणीत पात्र ठरणे आवश्यक आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि 19 वर्षांखालील असणे अनिवार्य आहे.

👉 अर्ज प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे: स्पर्धा प्रमाणपत्रे, आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: दि. 24 एप्रिल 2026

अर्ज सादर ठिकाण: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा संकुल, बुलढाणा

विभागस्तरीय चाचण्या दि. 27 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top