mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसचा अपघात : Bus carrying devotees on a pilgrimage meets with an accident.

शेअर करा :

Bus carrying devotees on a pilgrimage meets with an accident. : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसचा अपघात; दोन महिलांचा मृत्यू, 38 जखमी

Bus carrying devotees on a pilgrimage meets with an accident.


बुलढाणा (प्रतिनिधी):

काशीविश्वनाथ व अयोध्या दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला गाझीपूर जिल्ह्यातील नंदगज येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 38 भाविक जखमी झाले आहेत.

ही बस वाराणसी–गोरखपूर महामार्गावरून प्रवास करत असताना आज (दि. 9 एप्रिल) सकाळी सुमारे 11.30 वाजता अपघात घडला. यात्रेकरू नेपाळमार्गे विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी निघाले होते.

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अकोला येथील 50 वर्षीय अन्नपूर्णाबाई तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील सरस्वतीबाई पाखरे यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अपघाताची माहिती मिळताच उत्तर प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून जखमींना तातडीने सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. त्यांनी जिल्हाधिकारी दिनेश कुमार व सीएमओ डॉ. सुनील पांडे यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली.

Bus carrying devotees on a pilgrimage meets with an accident.


तसेच, त्यांच्या कार्यालयातील अधिकारी डॉ. गोपाल डिके व आचल भाटिया हे मदतीसाठी घटनास्थळी रवाना झाले असून दिल्लीहूनही विशेष पथक पाठविण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top