mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समृद्धी महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात : Bizarre three-vehicle accident on the Samruddhi Expressway.

शेअर करा :

Bizarre three-vehicle accident on the Samruddhi Expressway. :समृद्धी महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात 

Bizarre three-vehicle accident on the Samruddhi Expressway.
समृद्धी महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात आठ जखमी, दोघे गंभीर


मेहकर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. १० एप्रिलच्या सायंकाळी चार वाजता या मार्गावर आणखी एक विचित्र अपघात घडला. एका कारने समोरील वाहनाला धडक दिल्यानंतर एकामागोमाग आणखी दोन वाहने त्या वाहनावर धडकली. या अपघातात आठ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापूरजवळ चॅनेल क्रमांक २९३ वर हा विचित्र अपघात घडला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोरवर फर्दापूरनजीक चॅनेल क्रमांक २९३ जवळ अपघात घडल्याची माहिती समृद्धी महामार्ग पोलिसांना छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून कळविण्यात आली. त्यानुसार सिंदखेड राजा महामार्ग उपकेंद्राचे एपीआय इंगळे हे मदतकार्यासाठी सहकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले. अपघातस्थळावर नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-१७-बीव्ही-००६१ क्रमांकाच्या नेक्सा कारचा चालक शशांक कृष्णा खेरणार (वय २५) रा. साकूर, ता. संगमनेर याने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. जखमीला बाहेर काढत असतानाच एमएच-१४-एच-२१३८ क्रमांकाच्या भरधाव कारने इनोव्हा गाडीला धडक दिली. या अपघातानंतर दोन्ही वाहने नेक्सा कारवर येऊन आदळली. यावेळी मदत करणारे महामार्ग पोलिस आकाश मोहाडे, संतोष सोनुने, सचिन आंधळे व फायरचे परमेश्वर शिंदे हे किरकोळ जखमी झाले. तसेच मदतीला आलेले ट्रकचालक मोईनोद्दीन मोहंमद शेख रा. वसई यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलविण्यात आले. धडक देणारा औरा कारचा चालक अक्षय चनाप रा. बार्शी टाकळी हा फरार झाला आहे. त्याच्या वाहनातील अमित बोंडे व तेजस वाघोरे हेदेखील किरकोळ जखमी झाले. इनोव्हाचालक निजाम खान वकील खान यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top