The Burning Truck on Prosperity! : इव्हर्टरच्या बॅटरी घेऊन जाणाऱ्या ट्रकमधील बॅटरीने अचानक पेट घेतला. समृद्धी महामार्गावर ही घटना घडली.
इव्हर्टर बॅटरीने घेतला पेट : बनारस येथून जात होता नाशिककडे


दुसरबीड : इव्हर्टरच्या बॅटरी घेऊन जाणाऱ्या ट्रकमधील बॅटरीने अचानक पेट घेतला. धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक कडेला उभा केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र ट्रक व त्यामधील बॅटरी पूर्णतः जळून खाक झाल्या. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी आठ च्या सुमारास दुसरबीडजवळ ही घटना घडली.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
गाजीपूर येथील चालक रोहित कुमार हा बनारस येथून यूपी ६५ आर डी २१४० या क्रमांकाच्या ट्रकमध्ये इन्व्हर्टर बॅटरी घेऊन नाशिककडे समृद्धी महामार्गाने निघाला होता. दुसरबीडजवळ चॅनेल क्रमांक ३१२ वर मागे ठेवलेल्या बॅटरीमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने ट्रक रस्त्याच्या एका कडेला उभा केला. तोपर्यंत बॅटरींनी मोठी आग पकडली होती. घटनेची माहिती समजताच समृद्धी महामार्ग पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, शेख नासिर, नाजीम चौधरी, श्रीकृष्ण दूंगू, गायकवाड, इंदल राजपूत हे घटनास्थळी पोहोचले. समृद्धी महामार्गावरील दोन लहान अग्निशामक वाहन तसेच मेहकर नगरपालिकेचे एक अग्निशमन दल तातडीने पोहोचले. तोपर्यंत वाहनातील सर्व बॅटरीज जळून खाक झाल्या. तसेच ट्रकही जळाला. तिन्ही वाहनांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत मोठी आर्थिक हानी झाली आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला.


