mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

दहा हजारांसाठी गमावली नोकरी : Lost Job Over Ten Thousand

शेअर करा :

Lost Job Over Ten Thousand : दहा हजारांसाठी गमावली नोकरी

Lost Job Over Ten Thousand
लाचखोर कंत्राटी अभियंत्यास रंगेहाथ पकडले : एसीबीचा ट्रॅप यशस्वी

बुलढाणा : 

आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. कंत्राटी तत्वावर अत्यल्प मानधनावर नोकऱ्या कराव्या लागत आहेत. ‘समान काम, समान वेतना’साठी कंत्राटींच्या विविध संघटना लढत आहेत. आजघडीला मिळालेली नोकरी टिकविणेदेखील अवघड झाले आहे. पैशांची लालसाही त्याला कारणीभूत ठरत आहे. मोताळा पंचायत समितीमधील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला अवघ्या दहा हजारांसाठी आपली नोकरी गमवावी लागली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ एप्रिलला सायंकाळी पिंपळगाव राजा ते मोताळा मार्गावर फुली फाट्यावर दहा हजारांची लाच घेताना अभियंत्यास पकडण्यात आले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

 

एसीबीच्या पथकाने सचिन शत्रुघ्न इंगळे (वय ३३) या अभियंत्यास अटक केली आहे. खामगाव तालुक्यातील उमरा येथील रहिवासी असलेला हा अभियंता मोताळा पंचायत समितीमध्ये कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंतापदी कामकाज पाहतो. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अल्पसंख्याक संवर्गातून मंजूर असलेल्या घरकुलाचा दुसरा ७० हजार रुपयांचा हप्ता मिळवून देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तक्रारकर्त्याकडे अभियंता इंगळे याने २५ हजारांची लाच मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर १५ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती १० हजार रुपये लाच स्वीकारण्यास अभियंत्याने संमती दिली. दरम्यान, १५ एप्रिल रोजी सायंकाळी एसीबीच्या पथकाने फुली फाट्यावर सापळा रचला. रक्कम स्वीकारताच आरोपी अभियंत्यास अटक करण्यात आली.

सापळा कारवाईत सहभागी अधिकारी, कर्मचारी

सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रमेश पवार, सापळा पथक पोहेकॉ दीपक जाधव, अमोल झिने, जगदिश पवार, शैलेश सोनवणे, लक्ष्मीकांत इंगळे, रणजित व्यवहारे, पंढरी शेळके, अर्शद शेख यांनी हा ट्रॅप यशस्वी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top