Inauguration of the Chandol Branch of Divyajyoti Women’s Cooperative Credit Society : दिव्यज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या चांडोळ शाखेचे उदघाटन : केंद्रीय मंत्र्यांकडून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन

चांडोळ, : सहकारातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, या उदात्त हेतूने सहकारी पतसंस्थांनी समाजातील होतकरू तरुणांना आणि महिलांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य करून उद्योजक निर्माण करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार श्री. प्रतापराव जाधव यांनी केले. चांडोळ येथे दिव्यज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. समाजाच्या उत्थानासाठी हे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
चांडोळ येथे दिव्यज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या शाखा विस्ताराचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अंकुशराव पाटील आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शाखेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

यावेळी दिव्यज्योती महिला अर्बनच्या कार्यकारी संचालिका वर्षाताई माधव तायडे यांनी संस्थेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा विस्तृत आढावा सादर केला. भविष्यात महिलांना उद्योगासाठी संस्था अर्थसहाय्य देण्यासाठी कटिबद्ध असून, सर्वसामान्यांसाठी संस्था अविरतपणे कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. संस्थेच्या अध्यक्षा प्रमिलाताई भरत वाघुर्डे आणि उपाध्यक्ष सीमा अनिल कुटे यांनी उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले.
या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे देविदास पाटील, अनिल जाधव, गजानन देशमुख, राजू चांदा, विष्णू वाघ, विष्णू उगले, पुरषोत्तम भोंडे, योगेश राजपूत, दीपक टाकसाळ, चक्रधर उबाळे, सोनू तायडे, सुरेश भिवसनकर यांचा समावेश होता. तसेच, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, धाडचे सरपंच सावित्रीबाई बोर्डे, नंदूभाऊ सवडतकर, रामकृष्ण तायडे, शिवाजी देशमुख, दिगंबर जाधव, यशवंत सोनुने, सागर जयस्वाल, साखरे महाराज, सुरेश धनावत, दीपक धनावत, राहुल सोलंके, सचिन ताटू, विजय जाधव, विनोद खडके, मराठा अर्बनचे अध्यक्ष श्रीकृष्ण जेऊघाले, नाना माळोदे, निलेश गोरे, दिनेश काळे, हरिदास गोरे, गणेश सोनुने, रामराव जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश गुजर, मयूर पडोळ, संदीप पालकर, अमोल शिंदे, विलास गुजर, टीका खान, शालिग्राम वाघ, सईद खासाब, माणिकराव खांडवे, योगेश ताठे, अभिषेक भराड, डॉ. राजेंद्र तायडे, डॉ. प्रवीण तायडे, प्रवीण वाघ, संतोष आघाव, शकील सौदागर, अनिस जमदार, मोतीराम बिबे, देविदास जाधव, विशाल शेळके, आत्माराम नरवाडे, सिद्धू लडके, भास्कर मघाडे, बबन फेपाळे, सिद्धार्थ जाधव, प्रमोद खोंडे, अविनाश क्षीरसागर, राजू गायकवाड, छोटू मेहेर, कैलास रोकडे, विशाल गावंडे, सुनील महाजन, शरद पालकर, सुनील वाघ, अंकुश डुकरे, रामदास कानडजे, सागर जट्टे, शेषराव ठाकरे, दिलीपमामा जट्टे, दिलीप ब्राह्मणे, सचिन जोशी यांच्यासह असंख्य नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कुटे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर माधव तायडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबलू वाघुर्डे, शरद शेरे, नागेश मोहिते, ईश्वर कोप्पे, सतीश धनावत, अक्षय सोनुने, दीपक शेळके, उदय जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. दिव्यज्योती महिला सहकारी पतसंस्थेची ही नवीन शाखा चांडोळ परिसरातील महिला आणि तरुणांना आर्थिक सक्षमतेकडे नेण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


