mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गजरखेड फाट्याजवळ परप्रांतीय मजुराचा मृत्यू घातपाताचा संशय : Migrant Worker Dies Near Gajarkhed Junction; Foul Play Suspected

शेअर करा :

Migrant Worker Dies Near Gajarkhed Junction; Foul Play Suspected : गजरखेड फाट्याजवळ परप्रांतीय मजुराचा मृत्यू घातपाताचा संशय

Migrant Worker Dies Near Gajarkhed Junction; Foul Play Suspected


मेहकर : 

साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव उंडा येथे एका परप्रांतीय मजुराचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप समोर आले नसलेतरी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मेहकर ते चिखली मार्गावर पिंपळगाव उंडा ते गजरखेड फाट्यादरम्यान हार्वेस्टरवर गहू, हरभरा काढण्याचे काम करणारे परप्रांतीय मजूर राहतात. ३० एप्रिलच्या दुपारी या ठिकाणी एका परप्रांतीय मजुराचा मृतदेह आढळून आला. हा आकस्मित मृत्यू की घातपात याचा शोध साखरखेर्डा पोलीस घेत आहेत.

पिंपळगाव उंडाजवळ गजरखेड फाट्यावर रसवंतीच्या बाजूला पंजाब येथून आलेले हार्वेस्टर उभे होते. त्यावर काम करणाऱ्या एका मजुराचा २९ एप्रिल २०२६ च्या रात्री मृत्यू झाला. याबाबत साखरखेर्डा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली. साखरखेर्डा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. करमजीत सिंग जनमजीत सिंग (वय ३४) रा. शाकीरपूरखान, पंजाब असे मृत मजुराचे नाव आहे.

मृत्युमुखी पडलेल्या मजुराच्या डोक्याला मार लागलेला आहे. त्यामुळे त्याचा घातपात तर नाही ना, अशी चर्चा होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top