27 new vehicles inducted into the police force fleet : जिल्हा पोलीस दलामध्ये नवीकोरी २७ वाहने शासनाने उपलब्ध केली असून त्याचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.


महाराष्ट्रदिनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
बुलढाणा : पोलीस दलामध्ये जिल्ह्यासाठी नवीकोरी २७ वाहने शासनाने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे रीतसर उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांच्याहस्ते महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर करण्यात आले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागासाठी या वाहनांची मोठी मदत होणार आहे. २७ नव्या वाहनांचे उद्घाटन झाल्यानंत्र ही व्हॅन वाहने पोलीस विभागाला हस्तांतरित करण्यात आली.
दामिनीसाठी सात वाहने
या वाहनांमध्ये महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकांच्या ७ वाहनांचाही समावेश आहे. नव्या वाहनांमुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे.


