mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मक्याच्या शेताला आग : सुमारे ५ लाखांचे नुकसान : Fire in Maize Field: Loss of Approximately Rs5 Lakhs

शेअर करा :

Fire in Maize Field: Loss of Approximately Rs5 Lakhs : मक्याच्या शेताला आग : सुमारे ५ लाखांचे नुकसान

Fire in Maize Field: Loss of Approximately Rs5 Lakhs
सुमारे ५ लाखांचे नुकसान कंबरखेड येथील शेतकऱ्याचे नुकसान

हिवरा आश्रम : परिसरातील कंबरखेड शिवारात गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे ९ वाजताच्या सुमारास भीषण आग लागून मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या आगीत शेतकरी व्यंकटराव लक्ष्मण धोंडगे यांच्या गट क्रमांक २६० व १५८ मधील सुमारे ४ एकर शेती जळून खाक झाली.

या आगीत मका पिकासह स्प्रिंक्लर, तोट्या, दोरखंड, लिंबाची झाडे तसेच सरपण जळून पूर्णतः नष्ट झाले. यामध्ये सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आग इतकी भीषण होती की, शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. आग विझविण्यासाठी जनार्धन धोंडगे, शंकर धोंडगे, सखाराम वायाळ, सोहम धोंडगे, योगेश धोंडगे, बंडू डोळस, शिवाजी सोनूने, शरद धोंडगे तसेच व्यंकटराव धोंडगे यांनी अथक प्रयत्न केले. तलाठी तानाजी वाठोरे यांनी पंचनामा केला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top